About Gadhinglaj

आमचं गडहिंग्लज :
कोल्हापूर जिल्हाच्या दक्षिण भागातील तालुका म्हणजे गडहिंग्लज. महाराष्ट्र कर्नाटकाच्या हद्दीवर वसलेल्या आमच्या गडहिंग्लजात गूळ, भुईमूग व मिरचीची मोठी बाजारपेठ प्रसिद्ध आहे. जवळचं हरळी येथे साखर कारखाना व तेलगिरणी आहे.
गडहिंग्लजचे नाते व्यापाराच्या माध्यमातुन कोकणाशीही घट्ट जुळले आहे गडहिंग्लजमधून कोकणात प्रवेश करताना येथील पर्यटन न्याहाळण्याची संधी पर्यटकांना आहे.

ऐतिहासिक वारसा :
छातिचा कोट करून इतिहासाची साक्ष देणारा आणि शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला सामनागड येथे आहे.

सांस्कृतिक वारसा :
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा केलेले पू . साने गुरूजी मोफत वाचनालय गडहिंग्लजमध्ये आहे.
तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व जेष्ठ साहित्यिक डॉ . राजन गवस यांचे मुळ गाव करंबळी हे आहे.
गडहिंग्लजमधली नाट्यसंस्कृती सर्वदूर पोचली आहे. भडगाव , गडहिंग्लज , करंबळी, कडगाव परिसरात प्रसिद्ध मराठी चित्रपट जोगवा, सत्वपरिक्षा, देवघर यांचे चित्रीकरण  झाले आहे.

सामानगड :
हा किल्ला मुळ ‘ भीमसासगिरी ‘ या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. समुद्रसपाटीपासुन उंची  2972 फूट असून किल्ल्याचे क्षेत्रफळ  12.34 हेक्टर आहे. बाराव्या शतकात राजा भोजने हा किल्ला बांधला गेला तर शिवरायांच्या काळात किल्याची डागडुजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामींची या गडावर भेट झाल्याचा इतिहास आहे.

प्रतापराव गुर्जर स्मारक :
नेसरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले होते.
‘म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात.. या कुसुमाग्रजांच्या वीररसातील कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक शिवप्रेमींनी आवर्जून पाहावे असे हे स्मारक आहे.

 

 

काळभैरव मंदिर :
प्राचीन कलेचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहीले जाते डोंगर कपारीत मंदिर असुन शेजारीच शेंद्री चा जलाशय लक्ष वेधून घेतो. दरवर्षी फेब्रुवारीत या देवाची यात्रा भरते.

पेशवेकालीन गणेश मंदिर :
आजरा रोडवरील इंचनाळ येथे पेशवेकालीन गणेश मंदिर आहे.

भडगावची गुड्डाईदेवी :
भडगावची ग्रामदेवी श्री गुड्डाईदेवीचे मंदिर उंच टेकडावर आहे.

 

पाहण्यासारखं :

  • किल्ल़े सामानगड
  • सामानगडच्या पायथ्याशी चाळोबा मंदिर
  • नेसरी- कानडेवाडी दरम्यान सरसेनापती प्रतापराव गुर्जरांचे स्मारक
  • माद्याळचे सोमलिंग मंदिर
  • ऐनापुरमधील जैन शिलालेख
  • करंबळीतील नारायणदेव मंदिर
  • शेंद्री , करंबळी , नरेवाडी , वैरागवाडी , तेरणी , येणेचवाडीचे जलाशय

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *