विभागाचे नाव – कृषि विभाग :
खाते प्रमुखाचे पदनाम – कृषि अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – 0230 -2483126

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

  • जिल्हा परिषद सेस फंड व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत सुधारित कृषि अवजारे, स्वयंचलित अवजारे, पिक संरक्षण अवजारे, कीटकनाशके, जिवाणू संवर्धन पाकिटे व सेंद्रीय शेतीस चालना देणे.
  • अनुदानावर बायोगॅस सयंत्र उभारणी करणे.
  • अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व इतर बाबींचा अनुदानावर लाभ देणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना राबविणे.

गुणनियंत्रण

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. विक्रीस उपलब्ध करून देणेसाठी गुणनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून कामकाज पाहतात.

बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी : –   

  • बियाणे मान्यताप्राप्त, परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करावीत.
  • सिलबंद पिशवीतील बियाणे घ्यावीत.
  • सुटे बियाणे खरेदी करू नये.
  • प्रमाणित बियाणे खरेदी करावी.
  • पिशवीच्या टॅगवर बियाण्याची क्षमता व प्रमाणित मोहोर असावी.
  • बियाणे / रासायनिक खते / कीटकनाशके मुदतबाह्य झालेले नाहीत यांची खात्री करावी.
  • संबंधित विक्रेत्याकडून छापील पावती घ्यावी व त्यावर बॅचचा लॅट नंबर नमूद असावा.
  • दुकानदाराची पावतीच्या प्रतीवर स्वाक्षरी घ्यावी.
  • बियाणे पेरते वेळी पिशवी खालून फाडावी आणि पिशवीसह थोडे बियाणे व लेबल जपून ठेवावी. याचा उपयोग बियाणाची उगवण न झाल्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी होईल.

बियाणे उगवणे बाबत तक्रार असलेस तत्काळ बियाणे पिशवीसह तालुका कृषी अधिकारी / कृषी अधिकारी , पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी.

खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्र सुरु करणेसाठी व परवाना नुतनिकरणासाठी  www.mahaagri.gov.in  ही वेबसाईट पहावी.