आरोग्य विभाग :
विभागाचे नाव – आरोग्य विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – तालुका आरोग्य अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  0230-2483710

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

    • ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य विषयक सेवा पुरविणे.
    • शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणे.
    • लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने निरनिराळ्या योजनांची अंमलबजावणी करणे व तसेच माता व अर्भक मृत्युदर कमी करणे.
    • संसर्गजन्य रोग व साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवणे.
    • असंसार्गिक आजार रोग नियंत्रण करणे, कोविड लसीकरण .

तालुक्यातील सरकारी दवाखाने :
जिल्हा सामान्य  रुग्णालय – 01
ग्रामीण रुग्णालये – 02
प्राथमिक रुग्णालये – 10
प्राथमिक आरोग्य केंद्र पथक – 02

आरोग्य उपकेंद्रे -46
आयुर्वेदिक रुग्णालय-01
जि.प.दवाखाना-00

स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. 1977 साली झालेल्या 13 व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश यांनी समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उदिदष्ट ठरविले हेच 2000 साली ‘सर्वांना आरोग्य’ या नावाने प्रसिध्द झाले. या उदिदष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हिच गुरुकिल्ली आहे हे स्विकृत करण्यात आले.