ग्रामपंचायत विभाग :
हातकणंगले तालुक्यामध्ये 61 स्वतंत्र ग्रामपंचायती आहे. सदर 61 ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरिता ग्राम पंचायत अधिकारी 60 पदे मंजूर असून 54 कार्यरत आहेत. तसेच विस्तार अधिकारी (पंचायत) यांची 2 पदे मंजूर असून 2 विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत.
विभागाचे नांव – पंचायत विभाग, हातकणंगले
कार्यालय प्रमुख – मा.श्रीम. एस. ए. मोकाशी , गट विकास अधिकारी(वर्ग – १)
कार्यक्षेत्र – हातकणंगले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती.
संक्षिप्त कार्ये – टेबलनिहाय नेमून दिलेली कामे संलग्न केलेले सुचीप्रमाणे.
विभागाचे ध्येय धोरण :
- तालुक्यातील ग्रामिण भागाचा विकास, शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना राबविणे.
- तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सनियंत्रण करणे.
- राज्य व केंद्राच्या योजनांची अमलबजावणी करणे.