हातकणंगले तालुक्यात आळते परिसरात डोंगरावर रामलिंग, धुळोबा ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा आहे. हे फार पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मुर्ती आहेत. त्यांच्यावर सतत पाण्याची धार असल्याने याठिकाणी छोटे पाणी तळे तयार झाले आहे. बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख आहेत. थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे. हे अतिशय पुरातन देवस्थान आहे. याच परिसरात डोंगरमाथ्यावर अल्लमप्रभू हे लिंगायत समाजाचे देवस्थान आहे. येथे मध्ययुगीन बांधणीचे अल्लमप्रभूंचे मंदिर आहे.
