महात्मा गांधी नरेगा २००८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु
योजनेची वैशिष्ट्ये
१८ वर्षावरील पौढ व्यक्तींना वर्षभर अकुशल रोजगाराची हमी
मजुरांची नोंदणी व जॉब कार्ड
- रोजगार मिळविण्याकरिता जॉब कार्ड आवश्यक
- जॉब कार्डसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे आवश्यक
- १५ दिवसांत विनामुल्य जॉब कार्ड मिळणार
- प्रत्येक कुटुंबाला एक जॉब कार्ड
- जॉब कार्डची एक प्रत ग्रामपंचायतीमध्ये व एक प्रत कुटुंबाकडे
कामाची मागणी व अर्ज
- रोजगार आवश्यक असणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीने वेळोवेळी नमुना क्रमांक ४ मध्ये अर्ज करणे आवश्यक
- नमुना क्रमांक ४ मध्ये अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतीने पोच पावती देणे आवश्यक
- नमुना क्रमांक ४ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिळतील
- रोजगाराची मागणी नोंदणीकृत व्यक्ती किंवा समूह नमुना ४ मध्ये करू शकतो
- मागणी केल्यानंतर मजुराला १५ दिवसांत ग्रामपंचायतीने रोजगार पुरविणे आवश्यक अन्यथा बेरोजगार भत्ता मिळेल
- मजुराने किमान ०७ दिवस सलग काम करणे आवश्यक
- कामाच्या मागणीबाबत ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना तत्काळ कळवावे
- गावापासून ५ कि.मी. परिसरात रोजगार उपलब्ध केला जाईल अन्यथा जास्त अंतराकरिता प्रवास खर्चाची तरतूद
मजुरीचे दर
स्त्री व पुरुष मजुरांना केंद्रशासनाव्दारे दरवर्षी निर्धारित केलेल्या समान दराने मजुरी
केलेल्या कामाच्या प्रमाणात ( मोजमापानुसार ) मजुरीची निश्चिती
सोयी व सुविधा
रोजगाराच्या जागी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, लहान मुलांची देखभाल याकरीता मुलभूत सुविधा उपलब्ध
बँकव्दारे अथवा पोस्टामार्फत मजुरीचे प्रदान
कामाची निवड
ग्रामसभा अथवा ग्रामपंचायतीने कामांची शिफारस करावी तसेच हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा
योजनेंतर्गत सामुहिक तथा वैयक्तिक लाभाची कामे, कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणे हे योजनेचे वैशिष्ट्य
सार्वजनिक अथवा वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामातील कुशल कामे ग्रामपंचायतींमार्फत करावी
जुनी कामे पूर्ण करूनच नवीन कामे हाती घेणे आवश्यक
एकूण कामांपैकी किमान 50% कामे ग्रामपंचायतींमार्फत, उर्वरित कामे इतर यंत्रणांमार्फत
मजुरांची कामाची मागणी व मागणीनुसार कामे पुरविणे यांची सांगड घालण्यासाठी दरवर्षी लेबर बजेट तयार करणे आवश्यक
अकुशल – कुशल प्रमाण ग्रामपंचायत स्तरावर व यंत्रणेच्या कामांसाठी तालुका स्तरावर 60:40 राखणे
कंत्राटदार नेमण्यास व यंत्र वापरण्यावर बंदी
ग्राम रोजगार सेवक
योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामसेवक यांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती
कागदपत्रे सांभाळणे व दैनंदिन उपस्थितीची नोंद घेणे ही ग्राम रोजगार सेवकांची जबाबदारी
ग्राम रोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतीमार्फत बँक खात्यावर जमा होणार
पारदर्शकता
झालेल्या सर्व कामांचा तपशील व खर्च यांची माहिती ग्रामसभेला देण्यात येणार
कामाच्या ठिकाणी कामाचे फलक लावणे आवश्यक
मजुरांची हजेरीपट सर्वांना माहितीसाठी उपलब्ध असणार
झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण
नवीन उपक्रम
पंधरवड्यात ग्राम रोजगार दिनाचे आयोजन
माहिती व तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन सुरु (1800223839)
53030 क्रमांक वर सशुल्क SMS
तक्रार निवारण प्राधिकारी ( ombudsman) चे सक्षमीकरण
राज्य गुणवत्ता व्यवस्थापन निरिक्षक (State Quality Monitor) ची नियुक्ती
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
राज्यभरात ई – मस्टर लागू
आधारमार्फत नरेगाची मजुरी अदा
इलेक्ट्रॉनिक निधी व्यवस्थापन प्रणालीची (EFMS) सुरुवात
मजुरांना मजुरी प्रदानाची वेतन चिठ्ठी (Payslip) मिळणार
योजनेंतर्गत अनुज्ञेय कामे
जलसंधारण व जलसंवर्धन कामे
माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध (ग्रेडेबंडिंग), कंपार्टमेंट बांध, गॅबियन बंधारा, वनराई बंधारा, सलग समतल चर, ट्रेंच कम माउंट व तत्सम कामे
जलसिंचनाची कामे
तलाव व कालव्यातील गाळ काढणे / सफाई, अस्तरीकरणव नूतनीकरण, मातीचे कालवे, नदी – नाल्यांचे पुनरुज्जीवन
दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवडीसह)
पडिक (गायरान) जमिनीवर वृक्ष लागवड व वैरण विकास योजना, रोपवाटिका, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन
रस्ते
गावातील बारमाही रस्ते, जोडरस्ते, स्मशानभूमी / पाणीपुरवठा विहिरीकडे जाणारे सिमेंट काँक्रीट / पेवर ब्लॅाक्स वापरून केलेले रस्ते
वैयक्तिक लाभाची कामे
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील, भूसुधार योजनेतील इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी व वन अधिकार अधिनियमानुसार प्राप्त वन निवासी यांकरिता सिंचन विहिरी, शेततळी, फळबाग, भूसुधारणा इ. वैयक्तिक लाभाची कामे
सर्व जिल्ह्यात गावपातळीवर
खेळीची मैदाने तयार करणे
राजीव गांधी सेवा केंद्र
राज्य रोहयो अंतर्गत ‘क’ वर्ग नगरपालिकांचा समावेश
योजनेंतर्गतनवीन कामे
कृषी विषयक कामे
नॅडेप कंपोस्टिंग, गांडूळ खत तयार करणे (Vermi Composting). जैविक खते (Liquid Bio – manures),
पशुधन विषयक कामे
कुकुड पालनासाठी शेड, शेळ्या – बकऱ्यांसाठी शेड, कोबा करणे (Construction of pucca floor), युरीन टँक, चारा साठवण्याची व्यवस्था, अझोला – पूरक पशुखाद्य देण्याची व्यवस्था
मत्स्यव्यवसाय विषयक कामे
सार्वजनिक जमिनीवर हंगामी साचणाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय
समुद्रकिनारी भागातील कामे
समुद्र किनाऱ्यावर मासे सुकविण्यासाठी क्षेत्र (Fish Drying Yards) उपलब्ध करून देणे, बेल्ट व्हेजिटेशन
ग्रामीण क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासंबंधीची कामे
पिण्याच्या पाण्यासाठी साठवण खड्डे (Soak pits),
ग्रामीण स्वच्छतेची कामे
वैयक्तिक शौचालये, शाळेकरिता शौचालये, अंगणवाडी शौचालये, शोष खड्डे, उघडी गटारे, घनकचरा व्यवस्थापन
योजनेची माहिती : www.nrega.nic.in व www.mahaegs.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध
Yo, check it! Heard good things about oneid789. Gonna give it a spin and see if it lives up to the hype. Fingers crossed for some wins! Check it out yourself oneid789
Okay, I checked out taya77.info and it seemed pretty straightforward. Easy to get around the website . Will be betting a small amount to test it out. Will post updates about how everything went! taya77
luxebet https://www.laluxebet.com
Downloaded the 2255betapp and I gotta say, it’s pretty slick. Easy to navigate and placed a few winning bets already. Worth a download if you’re looking for something new. 2255betapp
Just signed up for Betesporte using the ‘betesporte cadastro’ process. Quick and easy, no hassles at all! Let’s see if my luck holds up. Check it out here: betesporte cadastro
Thinking about joining Lotogreenaffiliates. Anyone have experience with them? Heard good things, but always good to get real opinions. Dig deeper into the affiliate potential here: lotogreenaffiliates
Hey now, zh888game, you got some interesting stuff going on. The graphics are sharp and the gameplay is pretty smooth. I’m still exploring, but so far, so good. If you’re looking for something new, give it a try via: zh888game
PH3655login, the registration step is easy, so that I am able to quickly spin wheels in short time. I really like it due to its game selection. ph3655login
Yo, just tried 777mxcasino. It’s got that classic casino feel, you know? The slots are fun, and I actually won a little something! The site’s pretty straightforward too. Definitely worth a shot if you’re looking for some quick casino action. Find it here: 777mxcasino