पंचायत समिती हातकणगले जि.प. येथील समाज कल्याण विभाग या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पध्दत
| १ | कार्यक्रमाचे / योजनेचे नाव | राजर्षी शाहू घरकुल योजना २०% जि प राखीव निधी योजना. |
| २ | लाभधारकांसाठी पात्रतेच्या अटी | 1) ग्रा.पं चा ग्राम सभेचा ठराव २) जातीचा दाखला ३) रक्कम रु. ५००००/- आतील उत्पन्नाचा दाखला ४) स्वताच्या नावावरील मोकळ्या जागेचे घरठाण पत्रक ५) रहिवाशी दाखला |
| ३ | लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी | वरील अनुक्रमांक दोन प्रमाणे |
| ४ | या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती | लाभार्थीचा अर्ज ग्रामसेवक, जिल्हा परीषद सदस्य, विस्तार अधिकारी पंचायत व गट विकास अधिकारी यांचे कडे मंजुरीसाठी सादर केला जातो. |
| ५ | पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे | वरील अनुक्रम नंबर दोन मध्ये नमुद केलेल्या अटीची पुर्ततेनुसार. |
| ६ | या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) | लाभार्थीस जिल्हा परीषदे कडील २०% राखीव निधी मधून रक्कम रुपये ४००००/- अनुदान दिले जाते. |
| ७ | अनुदान वाटपाची पद्धत | लाभार्थीची निवड झालेनंतर घराचे काम सुरु करणेसाठी ग्रामपंचायत यांचेकडे रक्कम आदा केले जाते. |
| ८ | अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? | वरील अनुक्रम नंबर ४ मध्ये नमुद केलेल्या मार्गाने. |
| ९ | अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) | काही नाही. |
| १० | अन्य फी ( असल्यास ) | काही नाही. |
| ११ | अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. | पंचायत समिती हातकणगले येथील समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे. |
| १२ | सोबत जोडावयाची परीशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले / दस्तऐवज ) | जिल्हा परीषद सदस्यांची शिफारस. |
| १३ | त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना | काही नाही. |
| १४ | कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम | गट विकास अधिकारी पंचायत समिती हातकणगले |
| १५ | उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे | – |
| १६ | लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी | यादी समाज कल्याण विभाग पं.स. येथे उपलब्ध आहे. |
| १७ | उद्दीष्ट ( ठरविले असल्यास ) | जिल्हास्तरावर निश्चीत केले जाते. |
| १८ | शेरा ( असल्यास ) |
