पंचायत समिती गडहिंग्लज येथील संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –
| १ | कार्यक्रमाचे / योजनेचे नाव | इंदिरा आवास योजना ( नवीन घरकुल ) |
| २ | लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी | 1. दारिद्र रेषेच्या सर्व्हेक्षणात नोंद असणे आवश्यक.
2. घर बांधणेस स्वत:ची जागा,पडसर, जिर्णघर असणे आवश्यक 3. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 4. ग्रामसभेच्या ठरावाने कमी गुणाकाने प्राधान्य क्रमयादीतून निवड होणे आवश्यक |
| ३ | लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी | वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे |
| ४ | या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती | संबंधित ग्रामपंचायती मार्फत घरकुल बांधणेसाठी प्रस्ताव सादर झालेनंतर त्याची छाननी करून प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठविला जातो व तिकडून मंजुरी प्राप्त झालेवर लाभ दिला जातो.
|
| ५ | पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे | संबंधित ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव व अनुक्रम नंबर दोन मध्ये नमूद केलेल्या बाबींची प्रमाणपत्र |
| ६ | या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) | लाभार्थीस शासनामार्फत रक्कम रुपये ९५०००/- इतके अनुदान दिले जाते त्यामध्ये लाभार्थीने स्वत:चा हिस्सा म्हणून रक्कम रुपये ५००० /-
|
| ७ | अनुदान वाटपाची पद्धत | प्रस्तावास मंजुरी मिळालेनंतर जस जसे काम पूर्ण होईल त्या प्रमाणे ग्रामपंचायती मार्फत अनुदान आदा केले जाते. |
| ८ | अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? | गटविकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज |
| ९ | अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) | काही नाही. |
| १० | अन्य फी ( असल्यास ) | काही नाही. |
| ११ | अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे | काही नाही. |
| १२ | सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) | अनुक्रम नंबर दोन मध्ये नमूद केले प्रमाणे सर्व दाखल्याच्या प्रती |
| १३ | त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना | काही नाही. |
| १४ | कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान | गटविकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज |
| १५ | उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) | शासनाकडून प्राप्त अनुदान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत वितरीत केले जाते. |
| १६ | लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी | लाभार्थी याद्या ग्रा.प. निहाय गांव पातळीवर व पं.स.कार्यालयात ठेवणेत आलेल्या आहेत. |
| १७ | उद्दिष्ट ( ठरविले असल्यास ) | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे मार्फत ठरविले जाते ते उद्दिष्ठ आहे. |
| १८ | शेरा ( असल्यास) |
