अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )

पंचायत समिती हातकणंगले येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

०१ कार्यक्रमाचे / योजनेचे नांव अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )
०२ लाभधारकांसाठी पत्रतेच्या अटी लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे.
०३ लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रमांक २ प्रमाणे
०४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती अर्जासह सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्या नंतर जिल्हा निवड समिती कडून लाभार्थी निवड होते. २ वर्षाच्या कालावधीत रक्कम रु.५०,०००/- पर्यंतच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
०५ पात्रता ठरविण्याचे निकष आणि आवश्यक  कागदपत्रे लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे. मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला सादर करावा.
०६ या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जातेकाय ) लाभार्थी निवड झाल्यानंतर त्याला पुढील प्रमाणे बाब निहाय लाभ दिला जातो. अ-१००% अनुदानाच्या बाबी१)जलसिंचन – रु.२०,०००/- २) निविष्ठा रु.५,०००/-

३)औजारे व आयुधे रु.१०,०००/-

४) जमीन सुधारणा रु.४०,०००/-  ५) पाईपलाईन – २०,०००/-

६) जुनी विहीर दुरुस्ती रु.३०,०००/- ७) बैलगाडी/बैलजोडा रु.३०,०००/- ८) डीनवल बोअरिंग रु.२०,०००/- ९) परसबाग कार्यक्रम रु.२००/- १०) ताडपत्री रु.१०,०००/-मर्यादेपर्यंत

११) शेततळेरु.३५,०००/-पर्यंत. या प्रमाणे अनुदान देण्यात येते. या व्यतिरिक्त विहीर खुदाई करीता ७०,०००/-ते रु.१ लाखा पर्यंत अनुदान दिले जाते.

०७ अनुदान वाटपाची पद्धत वरील अनुक्रमांक ४,५,व ६ नुसार
०८ अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना पं.स.कार्यालय हातकणंगले.
०९ अर्जाबरोबर भरावयाची फी निरंक
१० अन्य फी निरंक
११ अर्जाचा नमुना कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना, यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध .
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,अपत्य दाखला व रहिवाशी दाखला.
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-याचे पदनाम कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापुर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती हातकणंगले
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल जिल्हा परिषद स्तरावर निधी उपलब्ध आहे.
१६ लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी सोबत जोडली आहे.
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )
१८ शेरा