हातकणंगले (तालुका मुख्यालय 16 45′ उत्तर 74 15′ पूर्व) कोल्हापूरच्या इशान्येस 21 कि.मी. असुन कोल्हापूर- मिरज  रेल्वे मार्गावरील स्थानक आहे. एका आख्यायिकेनुसार पूर्वी या गावातील एका व्यक्तीने उकळत्या तेलामध्ये आपले हात बुडवून आपण निष्पाप आहोत, असे दाखविण्याचे दिव्य केले, त्यावरुन या गावाला हातकणंगले असे नांव पडले अशी नोंद कोल्हापूर गॅझेटीयर मध्ये आहे. तालुक्याची एकुण लोकसंख्या 709628 (स्त्री 338378  पुरुष 371250) इतकी असून यातील ग्रामीण लोकसंख्या 354625 तर शहरी लोकसंख्या 355003 इतकी आहे. हातकणंगले-48 लोकसभा मतदारसंघ असून हातकणंगले – 278 व इचलकरंजी -279 असे 02 विधानसभा मतदारसंघ आहेत. इचलकरंजी ही महानगरपालिका आहे तर पेठ वडगांव, हुपरी व हातकणंगले या 03 नगरपरिषदा आहेत. तालुक्यात 11 जिल्हा परिषद तर 22 पंचायत समिती मतदारसंघ आहेत.

हातकणंगले तालुक्यामध्ये एकुण 60 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. प्राथमिक शाळा 176 व माध्यमिक शाळा 85 आहेत. ग्रामीण रुग्णालये 02, प्राथमिक आरोग्य केंद्रे 10, पशुवैद्यकीय दवाखाने 08 आहेत. साखर कारखान्यांची संख्या 03 असून दुध संघ 02 तर औद्योगीक वसाहती 02 आहेत. 

हातकणंगले पासून साधारण ९ कि.मी. अंतरावर इचलकरंजी शहर आहे. मोठया प्रमाणात येथे हातमाग व सुतगिरण्या आहेत. चांदीच्या उत्तम कलाकुसरीच्या दागीन्यांसाठी प्रसिध्द असलेले हुपरी याच तालुक्यामध्ये आहे.

हातकणंगले तालुक्यामध्ये श्री क्षेत्र रामलिंग, धुळोबा, अलंमप्रभू इ. प्राचीन मंदीरे तसेच कुंभोज येथील बाहुबली हे जैन धर्मीयांचे पवित्र धर्मस्थळ, टोप येथील चिन्मय गणेश मंदीर पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत.

हातकणंगले पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे.

PS Meeting and Disscusions

संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहेत. आपल्या सुचना, अभिप्राय व मार्गदर्शन विकास प्रक्रियेतील आमचे प्रेरणास्त्रोत असतील. संकेतस्थळामधील योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत लाभ घेतला जाईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.

धन्यवाद… पंचायत समिती, हातकणंगले