पंचायत समिती हातकणंगले येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –
| ०१ | कार्यक्रमाचे / योजनेचे नांव | अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना ) |
| ०२ | लाभधारकांसाठी पत्रतेच्या अटी | लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे. |
| ०३ | लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी | वरील अनुक्रमांक २ प्रमाणे |
| ०४ | या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती | अर्जासह सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्या नंतर जिल्हा निवड समिती कडून लाभार्थी निवड होते. २ वर्षाच्या कालावधीत रक्कम रु.५०,०००/- पर्यंतच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो. |
| ०५ | पात्रता ठरविण्याचे निकष आणि आवश्यक कागदपत्रे | लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे. मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला सादर करावा. |
| ०६ | या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जातेकाय ) | लाभार्थी निवड झाल्यानंतर त्याला पुढील प्रमाणे बाब निहाय लाभ दिला जातो. अ-१००% अनुदानाच्या बाबी१)जलसिंचन – रु.२०,०००/- २) निविष्ठा रु.५,०००/-
३)औजारे व आयुधे रु.१०,०००/- ४) जमीन सुधारणा रु.४०,०००/- ५) पाईपलाईन – २०,०००/- ६) जुनी विहीर दुरुस्ती रु.३०,०००/- ७) बैलगाडी/बैलजोडा रु.३०,०००/- ८) डीनवल बोअरिंग रु.२०,०००/- ९) परसबाग कार्यक्रम रु.२००/- १०) ताडपत्री रु.१०,०००/-मर्यादेपर्यंत ११) शेततळेरु.३५,०००/-पर्यंत. या प्रमाणे अनुदान देण्यात येते. या व्यतिरिक्त विहीर खुदाई करीता ७०,०००/-ते रु.१ लाखा पर्यंत अनुदान दिले जाते. |
| ०७ | अनुदान वाटपाची पद्धत | वरील अनुक्रमांक ४,५,व ६ नुसार |
| ०८ | अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? | कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना पं.स.कार्यालय हातकणंगले. |
| ०९ | अर्जाबरोबर भरावयाची फी | निरंक |
| १० | अन्य फी | निरंक |
| ११ | अर्जाचा नमुना | कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना, यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध . |
| १२ | सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) | जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,अपत्य दाखला व रहिवाशी दाखला. |
| १३ | त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना | — |
| १४ | कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-याचे पदनाम | कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापुर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती हातकणंगले |
| १५ | उपलब्ध रकमेचा तपशिल | जिल्हा परिषद स्तरावर निधी उपलब्ध आहे. |
| १६ | लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी | सोबत जोडली आहे. |
| १७ | उद्दिष्ट ( ठरविले असल्यास ) | — |
| १८ | शेरा | — |
